नाशिक – अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या आठ तासांत खून आणि जबरी चोरीप्रकरणी दोन आरोपी आणि दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
फिर्यादी सुनिल सुभाष देवरे (वय ४९, व्यवसाय – इलेक्ट्रिशियन, रा. गंगेश्वर रेसीडंन्सी, अंबड, नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा सुमित सुनिल देवरे (वय २०) याला ६ मार्च रोजी सायंकाळी शुभम पार्क चर्च समोर बोलावून धारदार शस्त्राने गंभीर जखमी करून खून करण्यात आला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच, गुन्ह्यानंतर आरोपींनी पळून जाण्यासाठी फिर्यादी नैतिक मुरलीधर ठाकुर यांना हत्याराचा धाक दाखवून त्यांच्या दुचाकीची जबरदस्तीने चोरी केली आणि पसार झाले. या घटनेबाबतही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक झनकसिंग घुनावत आणि त्यांच्या टीमने अथक प्रयत्न करत राणे नगर, मुंबई-आग्रा हायवे, नाशिक येथे सापळा रचून .अरुण उत्तम वैरागर (वय २०, रा. फडोळ मळा, अंबड, नाशिक) प्रसाद गोरक्षनाथ रेवगडे (वय १९, रा. डि.जी.पी. नगर, अंबड, नाशिक),विधी संघर्षग्रस्त दोन बालक (नाव गोपनीय) या संशयित आरोपींना अटक केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे, पोलीस निरीक्षक सुनिल पवार (प्रशासन), पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ (गुन्हे) यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांनी प्रभावी कारवाई केली.
पोउनि झनकसिंग घुनावत, पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपगारे, संदेश पाडवी, पो.ह. उमाकांत टिळेकर, पो.ना. राहुल जगझाप, पो.अं. मयुर पवार, तुषार मते, स्वप्निल गुंद्रे, सागर जाधव, प्रविण राठोड, अनिल गाढवे, सचिन करंजे, समाधान शिंदे, संदीप भुरे, दिपक निकम, योगेश सिरसाठ, आजिनाथ बारगजे, विष्णु जाधव, गणेश कोठुळे आणि संदिप डावरे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल पवार करीत आहेत.