Gold price drop : मागील तीन दिवसांत सोन्याचा भाव 4000 रुपयांनी तर चांदीचा 11,000 रुपयांनी घसरला

Gold price drop

Gold price drop : सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या दरांमुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांना शेवटी थोडा दिलासा मिळताना दिसत आहे. मागील अनेक महिन्यांपासून उच्चांकी दर गाठणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरात गेल्या तीन दिवसांपासून मोठी घसरण होत आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

जळगावमध्ये सोन्याचा दर 91,260 आणि चांदीचा 92,700 रुपये (Gold price drop)

जळगावमधील सराफ बाजारात आज (GST सहित) सोन्याचा दर प्रतितोळा 91,260 रुपये असून, चांदीचा दर 92,700 रुपये इतका नोंदवला गेला आहे. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या दरात 4000 रुपयांची घसरण, तर चांदीच्या दरात 11,000 रुपयांची घसरण झाली आहे.

ग्राहकांची “वेट अँड वॉच” भूमिका (Gold price drop)

दर कमी झाल्याने बाजारात गर्दी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात असला तरी, ग्राहक अजूनही वेट अँड वॉच भूमिकेत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. भविष्यात दर आणखी कमी होण्याची शक्यता लक्षात घेता, अनेकजण खरेदी थांबवून स्थितीचा आढावा घेत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा परिणाम? (Gold price drop)

सोने-चांदी व्यापाऱ्यांच्या मते, ही दरघसरण डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे झाली आहे. जागतिक स्तरावर आर्थिक अस्थिरतेमुळे आणि शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक थांबवली आहे.

पुढील काही दिवसांत दर आणखी खाली जाणार? (Gold price drop)

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सुरु असलेल्या घडामोडींचा परिणाम म्हणून पुढील काही दिवसांत सोन्याचा दर प्रतितोळा 55,000 रुपये पर्यंत खाली येऊ शकतो. काही दिवसांपूर्वी हा दर 96,000 रुपयांपर्यंत पोहोचला होता, त्यामुळे ही मोठी घसरण ठरते.

गुंतवणूकदारांची संभ्रमित अवस्था

एरवी सुरक्षित मानली जाणारी सोने-गुंतवणूक सध्या अनेकांना जोखमीची वाटत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारही विचारपूर्वक निर्णय घेत आहेत.