नाशिक रोड, प्रतिनिधी : भुसावळ विभागाच्या इगतपुरी-भुसावळ दरम्यान गालन स्थानक येथे अप आणि डाउन लूप लाईन्सचा विस्तार व इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसाठी विशेष ट्रॅफिक आणि पावर ब्लॉक घेण्यात येत आहे. या कारणास्तव काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.*रद्द झालेल्या गाड्या (13 आणि 14 सप्टेंबर):*- ट्रेन क्रमांक 11119: इगतपुरी – भुसावळ मेमू- ट्रेन क्रमांक 11120: भुसावळ – इगतपुरी मेमू- ट्रेन क्रमांक 11113: देवळाली – भुसावळ मेमू- ट्रेन क्रमांक 11114: भुसावळ – देवळाली मेमू- ट्रेन क्रमांक 01211: बडनेरा – नाशिक विशेष- ट्रेन क्रमांक 01212: नाशिक – बडनेरा विशेषया कामामुळे प्रवाशांना दिलगिरी व्यक्त करण्यात येत असून, प्रवाशांनी प्रवासाच्या आधी ताज्या अपडेट्ससाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट्स किंवा स्थानकांशी संपर्क साधावा.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.