Shocking News DJ Sound Death : पेठ रोड, नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत क्षयरोगी तरुणाचा मृत्यू

DJ Sound Death

डीजे आणि फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास; मृत्यूचे कारण शवविच्छेदनातून स्पष्ट

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

DJ Sound Death : पेठ रोडवरील फुलेनगर परिसरात रविवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नितीन फकिरा रणशिंगे (वय २३) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरुवातीस डीजेच्या मोठ्या आवाजामुळे मृत्यू DJ Sound Death झाल्याचा दावा करण्यात येत होता, मात्र शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यूचे खरे कारण क्षयरोग व फटाक्यांच्या धुरामुळे झालेला श्वसन त्रास असल्याचे समोर आले आहे.


मिरवणुकीत डीजेचा दणदणाट आणि फटाक्यांचा धूर(DJ Sound Death)

तरुण खाली कोसळला, तोंड-नाकातून रक्तस्त्राव

रविवारी (दि. १३) सायंकाळी ७.३० वाजता फुलेनगर तीन पुतळा परिसरात डीजे सुरू होता. त्यावेळी नितीन रणशिंगे हा युवक उपस्थित होता. डीजेचा आवाज वाढल्यानंतर त्याला त्रास होऊ लागला आणि काही क्षणांत तो खाली कोसळला. त्याच्या तोंडातून व नाकातून रक्तस्त्राव झाला. नातेवाईकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला.


शवविच्छेदन अहवाल काय सांगतो?

शवविच्छेदन अहवालानुसार नितीनला क्षयरोग होता आणि मिरवणुकीदरम्यान फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे त्याला श्वसनाचा गंभीर त्रास झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


डीजेचा आवाज: आरोग्यासाठी धोका

हृदयविकार, श्वसनाचे आजार असणाऱ्यांसाठी डीजे घातक

डीजेच्या आवाजामुळे अनेकदा रुग्णांना त्रास होतो, याबाबत तक्रारी सातत्याने येत असतात. विशेषतः हृदयविकाराने पीडित रुग्णांवर आवाजाच्या कंपनांचा मोठा परिणाम होतो. दोन वर्षांपूर्वी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान हृदयविकारग्रस्त एका बालकाचा मृत्यू झाला होता.


कायद्यांची पायमल्ली: डीजे आणि लेझर लाइटचा सर्रास वापर

आवाजाच्या मर्यादा धाब्यावर, प्रशासनाची कारवाई कुचकामी

सार्वजनिक ठिकाणी डीजे व लेझर लाइट वापरास बंदी असतानाही अनेक मंडळे या नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. आवाजाच्या मर्यादेचा भंग आणि लेझर लाइटमुळे डोळ्यांच्या इजा होण्याचे प्रकारही समोर आले आहेत. यामुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना धोका निर्माण होत आहे.