Positive Rashibhavishya : “२४ एप्रिल २०२५ राशीभविष्य: आजचा दिवस यश, आनंद आणि संधींनी भरलेला!”

Rashibhavishya

Rashibhavishya – गुरुवार, २४ एप्रिल २०२५
चैत्र कृष्ण एकादशी/द्वादशी | वरूथिनी एकादशी | श्री वल्लभाचार्य जयंती
ग्रीष्म ऋतू | उत्तरायण | विश्वावसु संवत्सर | शके १९४६ | संवत २०८१
राहू काळ – दुपारी १.३० ते ३.००
चंद्र नक्षत्र – शततारका (राहू), पू. भाद्रपदा (गुरू)
आज जन्मलेल्या बाळांची राशी – कुंभ

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

“आजचा दिवस शुभफलदायी आहे!”


Rashibhavishya (Horoscope Today)

ज्योतिष सल्लागार – मंगेश पंचाक्षरी, नाशिक. संपर्क – 8087520521

मेष (Aries)

चंद्र-गुरू योग लाभदायक. प्रापंचिक सुख मिळेल. नवे उपक्रम यशस्वी होतील. संशोधनात प्रगती.

वृषभ (Taurus)

सकारात्मक ऊर्जा वाढेल. समाजसेवा व कामातील नाव मिळेल. आनंददायी बातम्या येतील.

मिथुन (Gemini)

पारिवारिक पुण्याईचा लाभ. निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस. यशाची चव चाखाल.

कर्क (Cancer)

चंद्र अष्टमस्थानी – जोखीम घेणे टाळा. संयमाने दिवस घालवा. गुरूचा आशीर्वाद लाभदायक.

सिंह (Leo)

आत्मविश्वास उच्चांकावर. निर्णय घेताना कायदेशीर सल्ला घ्या. यशाचा मार्ग मोकळा.

कन्या (Virgo)

आर्थिक लाभ आणि खर्च दोन्ही. मानसिक तणाव जाणवेल. प्रवास टाळणे हितावह.

तुळ (Libra)

पंचम चंद्र शुभ फलदायक. गुंतवणुकीस योग्य वेळ. सल्ल्याने निर्णय घ्या.

वृश्चिक (Scorpio)

नवीन जबाबदाऱ्या स्वीकारा. हरवलेली वस्तू सापडेल. खर्च नियंत्रणात ठेवा.

धनु (Sagittarius)

नवीन संधी समोर येतील. महत्त्वाच्या बातम्या समजू शकतात. प्रवास संभवतो.

मकर (Capricorn)

कुटुंबाकडे लक्ष द्या. आध्यात्मिक अनुभव मिळतील. खेळ आणि राजकारणात यश.

कुंभ (Aquarius)

चंद्र राशीत आहे – संशोधन व येणी वसुलीस योग्य वेळ. घरगुती कामे सुरळीत पार पडतील.

मीन (Pisces)

धंद्यात लाभ. आर्थिक सुबत्ता. बचत उपयोगी ठरेल. दानधर्म करा.