मोखाडा आयटीआयमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

Shiva coronation day celebrated enthusiastically in Mokhada ITI

मोखाडा: येथील वीर तिलका मांजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन (६ जून) उत्साहात साजरा करण्यात आला. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री नामदार मंगल प्रभात लोढा साहेब यांच्या संकल्पनेतून आणि प्राचार्य रोहन चुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या आरंभी सर्व अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री. निलेश शिंगडे यांनी कुटुंब प्रबोधन या विषयावर व्याख्यान दिले. विभक्त कुटुंब पद्धती, मोबाईलचा दुष्परिणाम, कुटुंबातील विसंवाद अशा विविध बाबींवर त्यांनी प्रशिक्षणार्थींचे प्रबोधन केले. तसेच फिटर व्यवसायातील प्रशिक्षणार्थींना व्हर्चुसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स लि. या कंपनीने दिलेले ऑफर लेटर प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव धनवटे यांनी केले, तर आभार गटनिदेशक विजय खंदारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिल्पनिदेशक राजेश हरळ, शशिराज बाविस्कर, प्रकाश मारके, प्रवीण सरगर, दीपा राऊत, भाविका तुंमडे, अजहर शेख, सागर बोदडे, दीपेश जाधव, मुख्य लिपीक संतोष पाटील, माणिक घोडके, श्रीमती अंजली कंखरे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.