महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे आहे. इच्छुक उमेदवारांना सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची मुदतवाढ देण्यात आली असून, आता १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत https://mahayojnadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे.उपक्रमाअंतर्गत, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक योजनादूत, तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक योजनादूत निवडला जाणार आहे. राज्यभरात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाईल, ज्यांना दरमहा १०,००० रुपये मानधन दिले जाईल. योजनादूत हे शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवतील.सहभागासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र आणि संगणक ज्ञान असणे अपेक्षित आहे. अर्ज करताना आधार कार्ड, पदवी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार-संलग्न बँक खाते यांचे पुरावे अपलोड करणे आवश्यक आहे.सध्या १ लाख ६६ हजारांहून अधिक उमेदवारांनी या योजनेत नोंदणी केली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.