गंगापूर धरणातून मोठा विसर्ग, रामकुंड परिसर जलमय
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक (Godavari Flood Update): Godavari Flood Nashik News नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी, सोमवारी (दि. 23 जून) दुपारी 2 वाजता धरणातून 6,160 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. या विसर्गामुळे रामकुंड परिसरात पाणी शिरले असून, दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या छातीपर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे.
Godavari Flood Nashik News – पावसामुळे गोदावरीला दुसऱ्यांदा पूर
जून महिन्यातील ही गोदावरी नदीतील दुसरी पूरस्थिती आहे. गेल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यात पावसाने जोर धरल्यामुळे गंगापूर धरणाचा साठा 61.87% पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणी विसर्ग सुरू केला असून, नागरिकांनी नदीपात्रापासून दूर राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व नाशिक पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.
पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढतोय
- शुक्रवारी (दि. 20 जून): 1,160 क्यूसेक
- शनिवार (दि. 21 जून): 2,320 क्यूसेक
- रविवार (दि. 22 जून): 3,944 क्यूसेक
- सोमवार (दि. 23 जून): 6,160 क्यूसेक
पुराचा धोका लक्षात घेता खबरदारी बंधनकारक
गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाची स्थिती कायम असल्याने पुढील काळात विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीकाठावरील आपली पशुधन, वस्तू, वीज पंप इ. सुरक्षित स्थळी हलवाव्यात. कोणीही नदीपात्रात जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे.