धक्कादायक! कळवणमध्ये भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू; अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल

Shocking! An old man dies after being attacked by cows on a busy road in Kalvan; Shocking video goes viral

ऑनलाईन प्रतिनिधी | कळवण – कळवणमध्ये भररस्त्यावर गायींच्या हल्ल्यात एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

घटनेदरम्यान गायींनी अचानक हल्ला चढवला, आणि त्या वृद्धावर सलग वार करत राहिल्या. आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीचा प्रयत्न केला तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. हल्ला इतका गंभीर होता की त्यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकारानंतर भटक्या जनावरांच्या नियंत्रणाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, स्थानिक प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा:
व्हिडिओ लिंक (Facebook)