छत्रपती संभाजीनगर : ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक राजू नागरे आणि त्यांचा खाजगी एजंट संदीप ढोले यांना अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोघांविरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
प्रकरणाचा तपशील:
तक्रारदार ट्रान्सपोर्ट व्यवसायिक असून त्यांच्या मालकीचे सहा चाकी आयशर वाहन जालना ते मुंबई दरम्यान तुरीची डाळ आणि इतर कडधान्य वाहतूक करत होते. वाहनावर ओव्हरलोडची कारवाई होऊ नये, म्हणून आरटीओ निरीक्षक नागरे यांच्यासाठी एजंट संदीप ढोलेने ₹२०,००० लाचेची मागणी केली होती.
परंतु, तक्रारदाराने लाच देण्यास नकार दिला आणि अहिल्यानगर ACB कार्यालयात तक्रार केली. सत्यता पडताळणीदरम्यान, तडजोडीतून व्यवहार ₹१८,००० वर ठरला. त्यानंतर मंगळवारी ACB पथकाने सापळा रचून एजंट ढोले याला लाच स्वीकारताना पकडले, तर निरीक्षक नागरे याला कार्यालयातून अटक करण्यात आली.
तपास व सापळा पथक: सापळा अधिकारी: पोलीस निरीक्षक राजू आल्हाट
पथक सदस्य: हवालदार राधा खेमनर, रवींद्र निमसे, चंद्रकांत काळे, हारून शेख
कायदेशीर कारवाई:
लाच स्वीकारल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
गुन्हा वेदांतनगर पोलिस ठाण्यात मध्यरात्री नोंदविण्यात आला.
त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई सुरू आहे.
सारांश :
सरकारी यंत्रणेमधील भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी ACB सतत सक्रिय असून, या कारवाईमुळे आरटीओ कार्यालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.