मुंबई/नाशिक
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Maharashtra Electricity News – महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) महावितरणच्या प्रस्तावावर निर्णय घेत पुढील पाच वर्षांत वीजदरात टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे आदेश दिले आहेत.
ही योजना घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांवर लागू होणार असून, वीज खर्चात मोठी बचत होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच वीजदर कपातीचा ऐतिहासिक निर्णय!
महावितरणने पहिल्यांदाच सादर केलेल्या दर कपातीच्या प्रस्तावाला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची मंजुरी मिळाली असून, हा निर्णय राज्याच्या वीज इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे.
विशेष म्हणजे, स्मार्ट मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना दिवसा वीज वापरावर १०% ‘Time-of-Day’ (TOD) सवलत देण्यात येणार आहे.
Maharashtra Electricity News सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मितीला प्रोत्साहन
राज्य सरकारने सौर ऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ग्रीन एनर्जीचा प्रसार होणार असून, दीर्घकालीन फायदा होईल.
शेतकऱ्यांसाठी वीजदर कपात आणि सौर कृषी पंपांचा लाभ
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना
यामार्फत ४५ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवण्यात येत आहे.सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत दिवसा सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपांचा वापर शक्य होणार आहे.
योजनेनुसार:
- १६,००० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य
- ३ रुपये प्रति युनिट दराने वीज उपलब्ध
- पूर्णता कालावधी: डिसेंबर २०२६
वीजखरेदीतून ६६,००० कोटींची बचत, थेट ग्राहकांना लाभ
महावितरणने २०३० पर्यंत राज्यासाठी ८१,००० मेगावॅट क्षमतेचे उद्दिष्ट ठेवले आहे.
त्यासाठी:
- ४५,००० मेगावॅट क्षमतेचे वीज खरेदी करार पूर्ण
- ३१,००० मेगावॅट वीज नवीकरणीय ऊर्जेमधून
या सर्व प्रक्रियेमुळे महावितरणला तब्बल ₹६६,००० कोटींची बचत होणार असून, याचा थेट लाभ वीजदर कपात स्वरूपात ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांचे प्रतिपादन
लोकेश चंद्र, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महावितरण:
“वीजदर कपातीचा हा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वचनपूर्तीचा भाग आहे.
या निर्णयामुळे उद्योग, व्यापार व घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्याला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने नेण्यात याचा मोठा वाटा असेल. महावितरण दर्जेदार व किफायतशीर वीजपुरवठ्याचा संकल्प करत आहे.”