दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
केवळ १२ वर्षांचा असतानाही, विराजने जिद्द, आत्मविश्वास आणि असामान्य टॅलेंटच्या जोरावर दिव्यांगत्वावर मात करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी त्याच्या कौशल्यांचे भरभरून कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नागपूर – गायन, वक्तृत्व, कविता, स्टँड-अप कॉमेडी – विराजचा बहुआयामी टॅलेंट!
विराज केवळ गातोच नाही, तर तो स्टँड-अप कॉमेडियन, उत्तम कवी, प्रभावी वक्ता आणि बुद्धिमान विद्यार्थी देखील आहे. याशिवाय तो मुलांना प्रेरणा देण्यासाठी ऑनलाइन सेशन्स आणि समुपदेशन कार्यक्रमही घेतो.
जन्मजात अडचणींवर मात करत यशाचा शिखर गाठणारा विराज
- वाशीममधील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म
- स्कोलियोसिस व हिप डिसलोकेशनमुळे लहान वयातच संघर्ष सुरू
- वयाच्या दुसऱ्या वर्षापासून आतापर्यंत ३ शस्त्रक्रिया
- आज बेल्ट व विशेष बूटाच्या साहाय्याने तो चालतो व उभा राहतो
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकलेले यश
विराजने रामानुजम मॅथ्स कॉन्टेस्ट, सायन्स ऑलिम्पियाड, आणि इंटरनॅशनल टॅलेंट सर्च स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
त्याचे पुस्तक “Beyond Disability” यानेही विविध साहित्य पुरस्कार पटकावले.
चाईल्डलाईन जनजागृतीचे युवा राजदूत
विराज नॅशनल चाईल्डलाईन 1098 च्या प्रचारासाठी शाळा आणि संस्थांमध्ये जाऊन जनजागृती करतो.
त्याच्या आईने केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्याकडे त्याला चाईल्डलाईन ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून मान्यता देण्याची मागणी केली आहे.
लवकरच येणार विराजचं कवितासंग्रह
विराज लवकरच कवितेचं पुस्तक प्रकाशित करणार असून, त्याच्या कलेला आणखी व्यापक व्यासपीठ मिळणार आहे.
त्याच्या यशामागे आई चैताली ताई आणि भाऊ शंतनू यांचे मोलाचे पाठबळ आहे.
ना. श्री. नितीन गडकरींचे प्रेरणादायी शब्द
“विराजसारख्या मुलांकडून समाजाला नवी दिशा मिळते. त्याचे आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि विविध कौशल्ये पाहून मी भारावून गेलो. त्याच्या यशासाठी शुभेच्छा देतो.” — ना. श्री. नितीन गडकरी