Nashik News | बंद शाळेच्या इमारतीत उभारले जाणार शिक्षणमंत्र्यांचे कार्यालय; 1 कोटींचा खर्च जिल्हा नियोजन निधीतून

Nashik News | Education Minister's office to be built in closed school building; Rs 1 crore to be spent from District Planning Fund

गंगापूर रोडवरील महापालिकेच्या शाळा क्रमांक १६ मध्ये होणार दादा भुसे यांचे कार्यालय

नाशिक : Nashik News विद्यार्थ्यांअभावी बंद झालेल्या शाळेच्या इमारतीचा आता वेगळ्या कारणासाठी वापर होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे कार्यालय आता गंगापूर रोडवरील पोलिस वसाहतीतील शाळा क्रमांक १६ च्या इमारतीत उभारले जाणार आहे. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तब्बल १ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

रिक्त शाळेच्या जागेचा प्रशासनिक वापर (Nashik News)

महापालिकेच्या शाळा क्रमांक १६ ही विद्यार्थी संख्येअभावी बंद झाली होती. या दुमजली इमारतीचा तळमजला सध्या सर्व शिक्षा अभियान कार्यालयासाठी वापरला जातो, तर पहिल्या मजल्यावर ई-लर्निंग सेंटर कार्यरत आहे. आता दुसऱ्या मजल्यावर शिक्षणमंत्र्यांचे कार्यालय उभारले जाणार असून, त्यात मंत्री कार्यालय, ओएसबी, स्वीय सहायकांसाठी केबिन, स्टाफ ऑफिस आणि अभ्यागत कक्ष समाविष्ट असणार आहेत.

महापालिकेच्या शाळांची स्थिती

  • १०० शाळा (८८ प्राथमिक, १२ माध्यमिक) कार्यरत
  • विद्यार्थी संख्या : ३२,३९२
  • ५२ कोटींचा स्मार्ट स्कूल प्रकल्प राबवूनही विद्यार्थी गळती कायम

शालेय शिक्षणासाठी निधी की कार्यालयासाठी?

ही योजना महापालिकेच्या महासभेत मंजूर झाली असली तरी, विद्यार्थ्यांअभावी बंद झालेल्या शाळेतील इमारतीचा प्रशासनिक उपयोग योग्य की नाही?, यावर विविध स्तरांमध्ये चर्चा सुरू आहे.