नाशिक – Nashik Crime News – सिगारेटचे पैसे दिले नाहीत, या किरकोळ कारणावरून नाशिकच्या काझीगढी भागात तीन जणांच्या टोळक्याने दोन मित्रांवर हल्ला करून त्यांना धारदार शस्त्राने भोसकल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दोघे तरुण जखमी झाले असून पंचवटी पोलीस ठाण्यात हत्या करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
अटक व संशयित (Nashik Crime News)
- अटक आरोपी: मयुर उर्फ मया शिवाजी घातके व अत्तार बादशाह शहा
- फरार आरोपी: बंटी (पूर्ण नाव अद्याप अस्पष्ट)
- अटक आरोपींपैकी मया घातके हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.
घटना कशी घडली?
फिर्यादी अनंता राजेंद्र पाटील (वय २४, रा. पंचवटी) व त्याचा मित्र ऋतिक बाळासाहेब डोंगरे (वय २२, रा. काझीगढी) हे बुधवारी (दि. २५) संध्याकाळी अमरधाम गार्डन परिसरातील महावीर कौलकर यांच्या पानटपरीवर सिगारेट घेण्यासाठी गेले होते.
तेवढ्यात तिघेजण आले आणि “सिगारेटचे पैसे का दिले नाहीत?” या कारणावरून पाटील व डोंगरे यांच्यावर चढून बसले. त्यांनी दोघांना शिवीगाळ, लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर एका आरोपीने धारदार चाकूने सपासप वार केले.
दोघे जखमी, गुन्हा दाखल
या हल्ल्यात पाटील व डोंगरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून तिसरा फरार आरोपी शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक नेमाणे करीत आहेत.
नागरिकांना आवाहन
सार्वजनिक ठिकाणी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या वादांपासून सावध राहणे गरजेचे आहे. अशा घटनांची तत्काळ पोलिसांना माहिती द्या.