Sena-MNS Marathi Protest | ४ जुलैला नाशिकमध्ये सेना-मनसेचा मराठीचा जागर, हिंदी सक्तीविरोधात कुसुमाग्रज निवासस्थानी आंदोलन

Sena-MNS Marathi Protest | Sena-MNS Marathi wake-up call in Nashik on July 4, protest at Kusumagraj residence against Hindi compulsion

नाशिक मराठी भाषा आंदोलन | Marathi Language Protest in Nashik

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक : Sena-MNS Marathi Protest राज्यात वाढत्या हिंदी सक्तीविरोधात आता शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मराठीच्या रक्षणासाठी पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईत ५ जुलै रोजी आयोजित संयुक्त मोर्चापूर्वी, नाशिकमध्ये ४ जुलै रोजी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी मराठीचा जागर आणि हिंदी सक्तीचा निषेध करण्यात येणार आहे.

Sena-MNS Marathi Protest

पूर्वी मनसे व ठाकरे गटाचा गड मानल्या गेलेल्या नाशिकमध्ये आता या दोन्ही पक्षांची स्थिती दुर्बल झाली आहे. अनेक प्रमुख नेते भाजप व शिंदे गटात सामील झाल्याने ठाकरे गटाला मोठे राजकीय धक्के बसले आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेही नव्या हालचाली करत असून दिनकर पाटील यांच्या प्रवेशानंतर पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये युतीची शक्यता चर्चेत आली असून, हिंदी सक्तीच्या मुद्यावरून संयुक्त आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या ४ जुलैच्या कार्यक्रमानंतर दोन्ही पक्षांचे हजारो कार्यकर्ते ५ जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.

कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी होणाऱ्या कार्यक्रमासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी संकल्पना मांडली असून, ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करून अंतिम रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. रविवारी (२९ जून) यासाठी संयुक्त नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.