Hindisation Controversy | शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची पत्रकार परिषदेत घोषणा – राज्यात सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक : Dada Bhuse Viral News हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यात निर्माण झालेल्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “राज्यात सीबीएसईसह सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक आहे.“
मात्र या पत्रकार परिषदेत एक अनपेक्षित क्षण समोर आला. दादा भुसे पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला. फोन आल्यानंतर भुसे थेट उठून बाहेर गेले, आणि काही क्षणांनंतर पुन्हा परत येत पत्रकार परिषद पुढे सुरू केली. हा क्षण उपस्थितांनी टिपून घेतल्याने तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
भुसे यांची स्पष्ट भूमिका: Dada Bhuse Viral News
- मराठी ही केवळ मातृभाषा नाही, तर राज्याची राजभाषा देखील आहे.
- CBSE, ICSE आणि इतर सर्व शाळांमध्ये मराठी शिकविणे बंधनकारक आहे.
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी सुरू आहे.
- केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, हे राज्यासाठी गौरवाचे आहे.