Nashik Monsoon Alert | दहेगाव ते अस्तगाव मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, विद्यार्थ्यांना दररोज जीवघेणा प्रवास
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
चांदवड (नाशिक, २८ जून २०२५): Monsoon School Travel Nashik पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दहेगाव ते अस्तगाव जिल्हा परिषद रस्ता खड्ड्यांनी भरलेला असून, या चिखलमय रस्त्यावरून विद्यार्थ्यांना दररोज शाळेत ये-जा करावी लागत आहे. या गंभीर परिस्थितीमुळे पालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
घटनास्थळ आणि महत्त्व:
- रस्ता: इतर जिल्हा मार्ग क्र. २८१ (दहेगाव, ता. चांदवड – अस्तगाव, ता. नांदगाव)
- महत्त्व: दोन तालुके आणि गावांना जोडणारा मुख्य मार्ग
- दैनंदिन वर्दळ: शालेय विद्यार्थी, नागरिक आणि वाहने
शालेय विद्यार्थ्यांची हलाखी: Monsoon School Travel Nashik
- एकलव्यनगर, बिडगर वस्ती, सरोदे वस्ती या परिसरातील मुले दहेगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात.
- रस्त्यावर पावसाचे डबके आणि चिखल साचलेला असल्याने मुले पायातले बूट-चपला काढून हातात घेऊन शाळेत जातात.
- दररोजचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक आणि अपघातास आमंत्रण देणारा ठरत आहे.
पालक आणि ग्रामस्थांचा इशारा:
“रस्त्याची त्वरित दुरुस्ती न झाल्यास सर्व ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहोत,” असा ठाम इशारा ग्रामस्थ आणि पालकांनी दिला आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणीही जोर धरत आहे.