मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व पवार यांची पत्रकार परिषदेत माहिती • शालेय त्रिभाषा धोरणावर समिती स्थापन
मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाचे तीन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. यामध्ये १२ नवे विधेयक, एक प्रलंबित विधेयक व संयुक्त समितीकडील एक विधेयक यावर चर्चा होणार आहे. तसेच ६ अध्यादेश सभागृहात मांडले जाणार आहेत.
या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सह्याद्री अतिथीगृहात माध्यमांशी संवाद साधला.
मुंबई – शालेय त्रिभाषा धोरणाबाबत डॉ. नरेंद्र जाधव अध्यक्षतेखाली समिती
राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून मराठी भाषा सक्तीची राहणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्राचा सखोल अभ्यास करून विद्यार्थी हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीचा अहवाल येईपर्यंत राज्य सरकारने 16 एप्रिल आणि 17 जून 2025 चे तृतीय भाषा विषयक शासन निर्णय रद्द केल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पुढील हप्त्यासाठी ३६०० कोटी मंजूर
महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी उद्या (1 जुलै) पासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पावसाची स्थिती समाधानकारक; शेतकऱ्यांसाठी बियाणे-खत पुरवठा सुरळीत
राज्यात यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. काही भागांत पावसामुळे नुकसान झाल्याचे नमूद करत पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांसाठी बियाणे व खतांचा पुरवठा सुनिश्चित करण्यात आला असून तक्रारी तत्काळ सोडवल्या जात आहेत.