नाशिक : Nursery CCTV Surveillance
पाळणाघरांमध्ये लहान मुलांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराच्या घटनांमुळे केंद्र व राज्य शासनाने कठोर पावले उचलली आहेत. आता देशभरातील सर्व पाळणाघरांमध्ये CCTV कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले असून, पालकांना थेट सीसीटीव्ही ॲक्सेस देणेही आवश्यक ठरवले आहे.
पाळणाघरांसाठी नवीन नियमावली – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन अनिवार्य
- पाळणाघरांमध्ये फक्त महिला कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती बंधनकारक
- पोलिस चारित्र्य पडताळणी, वैद्यकीय प्रमाणपत्र, आणि प्रशिक्षण अनिवार्य
- प्रत्येक पाळणाघरात CCTV कॅमेरे अनिवार्य, पालकांना थेट निरीक्षणाची सुविधा
- दर महिन्याला पालकांसोबत बैठक अनिवार्य
- जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, पाळणाघरांवर नियंत्रण ठेवणार
- राज्यस्तरीय निरीक्षण समिती देखील कार्यरत
पालकांसाठी फायदे – आता पाळणाघरात काय घडते हे घरबसल्या पहा (Nursery CCTV Surveillance)
पाळणाघरातील प्रत्येक हालचाली सीसीटीव्हीद्वारे नोंदवल्या जाणार
पालकांना मोबाईलद्वारे थेट सीसीटीव्ही फीड मिळणार
कोणताही अत्याचार, दुर्लक्ष किंवा गैरवर्तन झाल्यास तत्काळ पुरावा उपलब्ध
पाळणाघर अत्याचाराच्या घटना – शासनाच्या दखलेमागची कारणे:
- खारघर (२०१६): १० महिन्यांच्या चिमुकलीवर कर्मचाऱ्याची अमानुष मारहाण
- वाशी (२०२३): १६ महिन्यांच्या बाळावर मारहाण
- डोंबिवली (२०२४): मुले बांधून ठेवणे, उलटे लटकवणे, मारहाण
या घटनांनंतर पालकांमध्ये मोठा असुरक्षिततेचा भाव निर्माण झाला होता. त्यामुळे केंद्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांचा अवलंब सर्व पाळणाघरांना करावा लागणार आहे.
पाळणाघर सुरक्षा नियम (Nursery Safety Guidelines):
- पाळणाघर शक्यतो तळमजल्यावर असावे
- मुलांच्या संख्येनुसार खोल्या, प्रकाश, वायुवीजन असावे
- खिडक्या योग्य उंचीवर, स्वच्छता व स्वच्छ पाणी आवश्यक
- योग्य पोषणयुक्त अन्न आणि खेळणी वयानुसार
- आपत्कालीन क्रमांक, हेल्पलाइन माहिती फलकावर दर्शवावी
- A/V उपकरणे आणि CCTV प्रणाली अपडेटेड ठेवणे आवश्यक
कर्मचाऱ्यांसाठी अटी व पात्रता:
- प्रत्येक २०-२५ मुलांसाठी १ पर्यवेक्षक व १ मदतनीस आवश्यक
- पर्यवेक्षक – किमान बारावी, मदतनीस – किमान दहावी पास
- बाल संगोपनातील दोन वर्षांचा अनुभव आवश्यक
- पोलिस व वैद्यकीय चारित्र्य पडताळणी अनिवार्य
पालकांनी घ्यावयाची काळजी – ‘चुका होऊ देऊ नका’:
पाळणाघराची परवानगी व रेकॉर्ड तपासा
CCTV ॲक्सेस पालकांना आहे की नाही ते खात्री करा
अचानक भेट देवून पाळणाघराची स्थिती तपासा
इतर पालकांशी चर्चा करून अनुभव जाणून घ्या
गैरप्रकार झाल्यास त्वरित पोलिस किंवा चाइल्ड वेल्फेअर कमिटीकडे तक्रार करा