Simhastha Kumbh Mela Nashik 2026 | ‘मिसिंग लिंक’ रस्त्यांना पुन्हा झळ! निधीअभावी रस्ते कामांवर कात्री

Nashik - Serious irregularities in the tender process of Nashik's Rs 1483 crore sewage project; Process continues without central and state approval

नाशिक | Simhastha Kumbh Mela Nashik 2026 – नाशिकमध्ये २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सादर केलेल्या भव्य आराखड्यातील रस्ते विकासकामांना निधी व वेळेच्या अभावामुळे मोठा फटका बसला आहे. विशेषतः ‘मिसिंग लिंक’ रस्त्यांची कामे पुन्हा एकदा रखडण्याच्या मार्गावर आहेत.

24 हजार कोटींच्या आराखड्यात अडथळेच अडथळे (Simhastha Kumbh Mela Nashik 2026)

महापालिकेसह विविध शासकीय यंत्रणांनी सादर केलेल्या ₹२४,००० कोटींच्या सिंहस्थ आराखड्यातून महापालिकेच्या वाट्याला १५,००० कोटींचा प्रस्ताव होता. मात्र, शासनाकडून केवळ ₹१,००० कोटींची तात्पुरती तरतूद करण्यात आली असून, हा निधी कुणाला मिळणार याबाबतही अनिश्चितता आहे.

‘मिसिंग लिंक’ रस्ते राहणार अपूर्ण

गत सिंहस्थातही जे रस्ते अपूर्ण राहिले, त्यांना यंदाच्या सिंहस्थात जोडण्याचे नियोजन होते. पण आता उर्वरित कालावधी, निधी, आणि भूसंपादनाच्या अडचणी लक्षात घेता ‘मिसिंग लिंक’ रस्त्यांची कामेही रद्द करण्याच्या तयारीत प्रशासन आहे.

ही १९ रस्ते कामे रद्द होणार

सिंहस्थ आराखड्यातील खालील १९ महत्वाच्या मिसिंग लिंक रस्त्यांची कामे आता स्थगित होण्याची शक्यता आहे:

  1. जयशंकर लॉन्स – नांदूर-दसक शिव
  2. ट्रॅक्टर हाउस – तपोवन STP
  3. टाकळी फाटा – गांधीनगर प्रेस
  4. संगम पूल – टाकळी STP – मरिमाता मंदिर
  5. उपनगर नाका – इच्छामणी गणपती मंदिर – निलगिरी बाग – RTO कॉर्नर
  6. मखमलाबाद गाव – जेहान सर्कल
  7. पपया नर्सरी – अंबड लिंक रोड
  8. सौभाग्यनगर – बिटको चौक – जेलरोड – गोदावरी नदी – नांदूर गाव जत्रा हॉटेल
  9. लेखानगर – कलानगर – वडाळा गाव – रविशंकर मार्ग – विजय-ममता चौक
  10. मखमलाबाद – फॉरेस्ट नर्सरी पूल
  11. नवशा गणपती – वृंदावन लॉन्स
  12. बारदान फाटा – अंबड लिंक रोड
  13. मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल – अक्षता मंगल कार्यालय
  14. हिरावाडी रोड – NIT कॉलेज
  15. NIT कॉलेज – म्हसरूळ लिंक रोड
  16. कानेटकर उद्यान – मोतीवाला कॉलेज

शासनाच्या विलंबामुळे विकासाला खिंडार

शासनाकडून निधीची स्पष्टता नसल्यामुळे, आणि वेळेच्या मर्यादेत कामे पूर्ण करणे शक्य नसल्याने, सिंहस्थपूर्वी कोणतेही मोठे रस्ते प्रकल्प पूर्ण होतील याची शक्यता अत्यल्प आहे. महापालिकेला यामुळे आता अनेक योजनांवर कात्री चालवावी लागणार आहे.