नाशिक | Doctor Extortion Case Nashik – शहरात एका डॉक्टरकडून हॉस्पिटलविषयी तक्रार करण्याची धमकी देत पाच लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीविरोधात गुन्हेगारी खंडणीचा (Extortion) तपास सुरू आहे.
Doctor Devendra Khairnar यांच्याकडे मागणी
फिर्यादी डॉ. देवेंद्र निवृत्ती खैरणार (रा. गोविंदनगर, नाशिक) हे हिरवेनगर येथील समराई सोसायटीत ‘फोर्जुन’ नावाचा हॉस्पिटल चालवत आहेत. २४ जून २०२५ रोजी, अंजुम मकराणी नावाच्या संशयिताने दवाखान्यात येऊन हॉस्पिटलविषयी तक्रार असल्याचे सांगून पाच लाखांची खंडणीची मागणी केली.
दवाखाना बंद करण्याची धमकी (Doctor Extortion Case Nashik)
डॉ. खैरणार यांनी या मागणीला थारा न दिल्याने, आरोपीने पुन्हा सलग पाच ते सहा दिवस संपर्क साधत दवाखाना बंद करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्रस्त होऊन डॉक्टरांनी मुंबईनाका पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणी अंजुम मकराणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार वाघ हे करत आहेत. पोलिसांकडून खंडणीप्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे आणि लवकरच कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.