Leopard Fear in Nashik | 7 वनक्षेत्रांमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; वर्षभरात 1901 पशुधन बळी, एका मुलाचा मृत्यू

Leopard Fear in Nashik | Leopards in 7 forest areas; 1901 livestock killed in a year, one child dies

नाशिक | Leopard Fear in Nashik– नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, येवला, चांदवड, मालेगाव, कनाशी व ताहाराबाद आदी वनक्षेत्रांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या १२ महिन्यांत १,१०९ जनावरे बिबट्यांच्या भक्ष्यस्थानी पडली असून, एक अल्पवयीन मुलगा मृत्युमुखी पडला आहे. चार नागरिक जखमी झाले आहेत.

वनक्षेत्रांतील नैसर्गिक अधिवास नष्ट – बिबट्यांचा वळसा मानवी वस्त्यांकडे

अन्नसाखळीतील बदल, जंगलात अतिक्रमण आणि नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास झाल्यामुळे बिबटे शिकारीसाठी मानवी वस्त्यांकडे वळत आहेत. यामुळे मानव-वन्यजीव संघर्षात तीव्र वाढ होत आहे.

घटनांची नोंद:

  • देवळा : शासकीय विश्रामगृहाजवळ बिबट्या निदर्शनास
  • भाबडबारी घाट : रुग्णवाहिकाचालकांना बिबट्या दिसला
  • मल्हार खाण परिसर : माजी खासदाराच्या बंगल्याजवळ गोदावरी काठाने बिबट्या फिरताना दिसला

ऊसलागवडीचा बिबट्यांना आश्रय!

दिंडोरी, नांदगाव, सटाणा आणि येवला भागात ऊसशेती मोठ्या प्रमाणात असल्याने उसाच्या फडात बिबट्यांना सुरक्षित अधिवास मिळतो. याच कारणामुळे ते नऊ महिने फडात राहतात, आणि पशुधन व भटक्या श्वानांवर हल्ले करतात.

पशुधन हानीचा आकडा (वनपरिक्षेत्रनिहाय):

वनपरिक्षेत्रहल्ल्यांची संख्या
दिंडोरी252
ताहाराबाद209
मालेगाव113
येवला109
सटाणा94
चांदवड61
कनाशी73
कळवण77
इतर121
एकूण1,109

शासकीय मदतीसाठी कागदपत्रांचा अडथळा

दिंडोरी तालुक्यातील विठ्ठल पोतदार (वय १६) याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. शासनाकडून २५ लाखांची नुकसानभरपाई जाहीर असली तरी, स्थलांतरित असल्यामुळे कुटुंबीयांकडून कागदपत्रे सादर होऊ न शकल्याने मदत रखडली आहे.

उद्धव अहिरे यांच्या विहिरीतील मृत बिबट्याचा तपास रखडला

पंचवटीतील मानेनगर येथे २० ऑक्टोबर रोजी विहिरीत मृत बिबट्या आढळला. तपास अद्याप अपूर्ण असून, शवविच्छेदनाचा व्हिसेरा रिपोर्ट मिळालेला नाही. या प्रकरणात मारेकरी किंवा गुन्हेगार शोधला गेलेला नाही.

नागरिकांनी बिबट्यांपासून बचावासाठी खबरदारी घ्यावी: (Leopard Fear in Nashik)

  • शेतात गटाने जाणे
  • टॉर्च, लाठी-काठ्या जवळ ठेवणे
  • लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी
  • संध्याकाळी व रात्री उशिरा शेतात एकटे न जाणे