Kidnapping Case | गोव्यातून अपहरण केलेल्या दोन अल्पवयीन मुलींना नाशिकमध्ये वाचवले; नाशिकरोड पोलिसांची वेळीच कारवाई

Kidnapping Case | Two minor girls kidnapped from Goa rescued in Nashik; Nashik Road Police takes timely action

नाशिक | Goa Minor Girls Kidnapping Case News Update– Kidnapping Case
गोव्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना उत्तर भारतात नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयितांचा नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी छडा लावला. लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्स्प्रेस या गाडीतून संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून अपहरणाचा कट उधळून लावण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणातील एक संशयित अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व चार जणांना गोवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

गोव्यातील कोंकोलीम पोलिस ठाण्यात दाखल अपहरणाचा गुन्हा (Kidnapping Case)

५ जुलै रोजी कोंकोलीम (Goa) पोलिस स्टेशन येथे दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची तक्रार दाखल झाली होती. तपासादरम्यान CCTV फुटेजच्या मदतीने मुली मुंबईकडे जात असल्याचे निष्पन्न झाले. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर गोवा पोलिसांनी आणखी सीसीटीव्ही चाचणी केली असता, दोन्ही मुली आणि दोन तरुण काशी एक्स्प्रेसने नाशिककडे रवाना झाल्याचे निदर्शनास आले.

नाशिकरोड पोलिसांनी दाखवली तत्परता; गोवा पोलिसांनी व्यक्त केला आभार

या माहितीच्या आधारे गोवा पोलिसांनी नाशिकरोड रेल्वे पोलिसांना तत्काळ सतर्क केले. त्यानुसार पोलिसांनी एक्स्प्रेस ट्रेनमधून संबंधित संशयितांना पकडून गोवा पोलिसांकडे सोपवले.