CA Exam Result 2025 Nashik: नाशिकच्या निरव हेमनानीचा दणक्यात प्रथम क्रमांक; सीए परीक्षेत जिल्ह्याचे नाव उज्वल

CA Exam Result 2025 Nashik: Nashik's Nirav Hemnani tops the list with a bang; District's name shines in CA exam

नाशिक | CA Exam Result 2025 Nashik
चार्टर्ड अकाउंटंट (CA) क्षेत्रात प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ICAI (इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया) द्वारे आयोजित सीए फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, नाशिकच्या विद्यार्थ्यांनी यंदाही घवघवीत यश मिळवले आहे.

नाशिकचा निरव हेमनानी फायनल परीक्षेत प्रथम, ऑल इंडिया रँक 47

  • निरव हेमनानी याने 431 गुण मिळवून नाशिकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला, तर देशपातळीवर 47 वा क्रमांक मिळवला.
  • राधिका सराफ हिने 401 गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला.
  • तितीक्षा संपथ हिने 393 गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
  • अरमान गिलानी (368) आणि सोनाई गुजराथी (366) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर.

CA इंटरमिजिएट परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांची टॉप कामगिरी:

विद्यार्थीगुणक्रमांक
सोहम मिलिंद वाघ4731
पार्श्व तातिया4592
राहुल जैस्वाल4483
तीर्था भाटमुळे4334
केयूर बेदमुथा4315

सीए फाउंडेशन परीक्षेतही नाशिककरांचा दबदबा: (CA Exam Result 2025 Nashik)

  • साक्षी चांडक354 गुण – प्रथम
  • रूजल करवा344 गुण – द्वितीय
  • सृष्टी चिंचोले342 गुण – तृतीय

ICAI Nashik शाखेची प्रतिक्रिया:

ICAI नाशिक शाखेचे अध्यक्ष जितेंद्र फाफट यांनी सांगितले की,

“हा निकाल नाशिकसाठी अत्यंत प्रेरणादायक आहे. विद्यार्थ्यांनी मेहनत, समर्पण आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. यामुळे सीए क्षेत्रात करिअर करावं, असा संदेश तरुणांना मिळतो.”

विद्यार्थी व पालकांचा गौरव

नाशिक शाखेचे उपाध्यक्ष अभिजीत मोदी, खजिनदार विशाल वाणी, सरचिटणीस मनोज तांबे, सदस्य रोहन कुलकर्णी, दिलीप बोरसे, शुभम मुंदडा, आणि WIRC उपाध्यक्ष पियुष चांडक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.