आज्जी बाईचा बटवा: घरगुती औषधे :—

ajicha batava

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

चहा कॉफी घेण्यापूर्वी पाणी का प्यावे?

सकाळी उठल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय करता? कपभर चहा किंवा कॉफी घेता. अनेकांना ही सवय असते. असे आपल्या पैकी अनेकजण करतात. सकाळी झोपेतून उठल्यावर चहा किंवा कॉफी घेतल्या शिवाय फ्रेश वाटत नाही. ही सवय चुकीची असल्याची जाणीव अनेकांना आहे. परंतु, रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी काहीही घेतल्यास आरोग्यावर सारखाच परिणाम होतो, हे खूप लोकांना माहीत नाही.

कॉफी किंवा चहा घेण्यापूर्वी ग्लासभर पाणी प्यावे, याची अनेकांना कल्पना नाही. सकाळी किंवा संध्याकाळी, चहा किंवा कॉफी घेण्याआधी थोडं पाणी अवश्य प्या. ही सवय आरोग्यदायी आहे. चहा कॉफी घेण्यापूर्वी, पाणी पिण्या मागचे कारण म्हणजे त्यामुळे पोटातील अ‍ॅसिडिटी कमी होते. चहा सुमारे ६ ph म्हणजे अ‍ॅसिडिक असतो आणि कॉफी ५ ph म्हणजे अ‍ॅसिडिक रेंज थोडीसी कमी आहे. म्हणून जेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी चहा किंवा कॉफी घेता तेव्हा अ‍ॅसिडिटी वाढते. तसंच काहीशी अल्सर्स आणि कॅन्सरच्या धोक्याची शक्यता असते. जर चहा किंवा कॉफी घेण्याआधी पाणी प्यायलात तर पोटातील अ‍ॅसिडची पातळी काहीशी सौम्य होते व पोटाच्या व इतर आरोग्याची हानी कमी होते. तसेच, चहाच्या अधिक अ‍ॅसिडिक स्वरूपामुळे दातांवर होणारा दुष्परिणाम कमी होतो. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातून टॉक्सिन्स निघून जाण्यास मदत होते.

Leave a Reply