वणी – वणी बसस्थानक परीसरातील कातर कुरपी भागातील नदीच्या काठालगत असलेल्या झाडाला युवक व अल्पवयीन मुलगी अशा दोघांनी अज्ञात कारणावरुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी ,बसस्थानक परीसरामागे कातर कुरपी नदीलगत असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक युवक व युवती असल्याची माहीती वणी पोलिसांना मिळाली.घटनास्थळी जाऊन वणी ग्रामीण रुग्णालयात तपासणी साठी दाखल केले असता ते दोघे मृत असल्याचे निष्पन्न झाले.दरम्यान या दोघांची ओळख पटविण्यात आली असुन हेमराज शंकर वाघ वय 20 ,रा.काठारा दिघर ,ता,कळवण व अल्पवयीन मुलगी रा,काठारा दिघर ,ता.कळवण , सदर मुलगी व हेमराज असे दोघे या दोघांची शोधमोहीम सुरु होती.दरम्यान सकाळच्या सुमारास वणी पोलिसांना ही माहीती मिळाली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.