सप्तशृंग गडाकडे जाणाऱ्या घाट रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष आहे का…

सप्तशृंग गडाकडे जाणाऱ्या घाट रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष आहे का…

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर भाविक शेकडो मैलांचा प्रवास करून श्री भगवतीच्या दर्शनासाठी सप्तशृंग गडावर येत असतात त्यातच सुरू असलेल्या श्रावण महिन्याचे औचित्य साधत श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरती येत असतात यात भाविक व निसर्ग / पर्यटन प्रेमी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सप्तशृंग गडावरती येत असतात त्यातच सुरू असलेला पावसाळा व सातत्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे सप्तशृंग गडावरील नैसर्गिक सौंदर्य उठून दिसत आहे मात्र सप्तशृंग गडावरील असलेल्या १० की.मीचा घाट रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे दहा किलोमीटरच्या घाट रस्त्यात अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य दिसत आहे त्यातच पावसाळ्यात घाट रस्त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले जात नाही.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

यामुळे आज दुपारच्या सुमारास
सुरू असलेली पावसाची संतदारी मुळे सप्तशृंग गडावरील घाट रस्त्यात थोड्या प्रमाणात दरड कोसळली यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोणतीही मदत उपलब्ध न झाल्याने सप्तशृंग गडावरील भाविकांच्या सुविधेसाठी असलेली श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेचे मुख्यव्यवस्थापक श्री सुदर्शन दहातोंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची टीम व गडावरील चालते बोलते मदत केंद्राचे सर्वेसर्व असलेले व ग्रामपंचायत सदस्य श्री संदीप बेनके यांच्या संयुक्तिक पुढाकाराने घाट रस्त्यात असलेली दरड व मातीचा ढिगारा तात्काळ स्वरूपात बाजूला करून येणाऱ्या भाविकांसाठी रस्ता सुरळीतपणे सुरू केला.

प्रसंगी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे मुख्यव्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, तुषार जाधव, आपत्ती व्यवस्थापन मंगेश केदारे, पराग कुलकर्णी, ज्योती, चालते बोलते मदत केंद्राचे सर्वेसर्वा श्री संदीप बेनके, तसेच आपत्ती व्यवस्थापन टीम व स्थानिक ग्रामस्थ.

चौकट-
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सप्तशृंग गडाकडे लक्ष आहे का…?
सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री क्षेत्र सप्तशृंग गडाच्या घाटाकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिसत नाही गेल्या अनेक दिवसांपासून सप्तशृंग गडावरील येण्याकरिता असलेला दहा किलोमीटरक्या संपूर्ण घाट रस्त्यात खड्ड्याचे साम्राज्य आहे त्यातच रस्त्याच्या कडेला असलेल्या सौरक्षण भिंती सुद्धा अनेक ठिकाणी ढासळलेल्या दिसत आहे मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिसून येत नाहीये.
-श्री.संदीप बेनके, चालते बोलते मदत केंद्राचे सर्वेसर्वा.

सागर मोर,वणी

Leave a Reply