नाशिक: नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह आहे. ढिकले शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी १० वाजता श्री काळाराम मंदिरात दर्शन घेऊन, रॅली काढून अर्ज दाखल केला जाईल.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गेल्या निवडणुकीत ढिकले यांनी प्रथमच उमेदवारी मिळवली होती आणि काट्याच्या लढतीत विजयी झाले होते. गेल्या पाच वर्षांत त्यांनी विविध विकास प्रकल्पांतून मतदारांमध्ये लोकप्रियता मिळवली. समाजमंदिरे बांधणे, पेठरोडसाठी निधी मंजूर करणे आणि पंचवटीत तपोवनात प्रकल्प उभारणे ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी होती. त्यामुळे भाजपाच्या उमेदवारी यादीत त्यांचे नाव अग्रक्रमाने आले.
ढिकले यांनी आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबवून नागरिकांशी सजीव संपर्क साधला होता, ज्यामुळे त्यांना पक्षात चांगले स्थान मिळाले. त्यांच्या वडिलांनी २००९ मध्ये हा मतदारसंघ जिंकला होता, आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ढिकले यांनीही हे यश मिळवले आहे.