नाशिक: (दि.29) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व जिल्हा शासकीय रुग्णालय येथील नाशिक ब्लड बॅंक यांच्या संयुक्त विद्यामाने 78 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन आरोग्य विद्यापीठाच्या आवारात रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
या रक्तदान शिबिरामध्ये विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन मोठया प्रमाणावर रक्तदान केले. यावेळी 50 पेक्षा अधिक रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. यावेळी सर्व इच्छुक रक्तदात्यांची शारीरिक तपासणी करुनच ते रक्तदानासाठी आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींनीच रक्तदान करावे याची खबरदारी घेतली होती. या रक्तदान शिबिराकरीता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गायकवाड, जिल्हा शासकीय रुग्णालयातील नाशिक ब्लड बॅंकेतील रक्त संक्रमण अधिकारी श्री. राजेंद्र दुसाणे, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी श्री. अनिल मोरे व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. तसेच विद्यापीठातील श्री. अनिल पावरा, श्री. मनोहर गवळी, श्रीमती गायत्री चौधरी, श्रीमती सोनाली चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.