पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरातील वादग्रस्त धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik : पुणे रोडवरील काठे गल्ली (Kate Galli) परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळावर अखेर महापालिकेने कारवाई केली आहे. तब्बल २५ वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही Nashik NMC ने कारवाई न केल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवारी (दि. २२) आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रशासनाने अखेर आज सकाळी अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्यास सुरुवात केली आहे.
Nashik पोलिसांचा मोठा बंदोबस्त, जमावबंदी आदेश लागू
या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांनी काठे गल्लीसह द्वारका परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी द्वारका ते काठे गल्ली आणि अन्य मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.
महंत सुधीरदास पुजारी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
कारवाईदरम्यान महंत सुधीरदास पुजारी (Sudhirdas Pujari) हे धार्मिक स्थळी पोहोचले असता पोलिसांनी त्यांच्यासह १० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच महंत अनिकेत शास्त्री (Aniket Shastri) यांना नजरकैदेत ठेवण्यात आले असून त्यांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आंदोलन सुरूच राहणार, हिंदुत्ववादी संघटनांचा इशारा
हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाला ठाम इशारा दिला आहे की, जोपर्यंत संपूर्ण अनधिकृत बांधकाम हटविले जात नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. दरम्यान, भाजप आमदार देवयानी फरांदे (Devayani Farande) देखील काठे गल्ली चौकात दाखल झाल्या असून या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत.
काठे गल्लीतील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याची महापालिकेची कारवाई सुरू असतानाच हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलनही तीव्र झाले आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. या प्रकरणाचा पुढील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.