Manikrao kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाचा दिलासा, तात्पुरता जामीन मंजूर

Manikrao kokate

नाशिक : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao kokate)यांना मोठा दिलासा मिळाला असून, सत्र न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने त्यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली असून, एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या आमदारकीला सध्या कोणताही धोका नाही.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

कोकाटेंवर नेमका काय आरोप?

खोट्या कागदपत्रांच्या आधारे सरकारी घर लाटल्याचा आरोप कोकाटेंवर ठेवण्यात आला होता. या प्रकरणात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, या निकालाविरोधात कोकाटेंनी सत्र न्यायालयात अपील दाखल केले आणि त्यांना जामीन मंजूर झाला.

विरोधकांचा हल्लाबोल, राजीनाम्याची मागणी

मुख्यमंत्री कोट्यातलं घर लाटल्याचा आरोप झाल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. “कोकाटेंचा (Manikrao kokate) राजीनामा कधी?” असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, सरकारी पातळीवर कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही.

बंदुकीच्या लायसन्समुळे बिंग फुटलं!

विशेष म्हणजे, कोकाटेंनी बंदुकीच्या लायसन्ससाठी सादर केलेल्या माहितीतून त्यांचं प्रकरण उघडकीस आलं. आता न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला असला तरी, या प्रकरणात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.