शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024. भाद्रपद शुक्ल तृतीया
हरितालिका व्रत
पूजन मुहूर्त दुपारी 3 वा पर्यन्त.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहुकाळ – सकाळी 10:30 ते 12
“आज शुभ दिवस आहे”
6 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे.
तुम्ही जन्मताच कलाकार व कलाप्रिय असता. तुम्ही तुमच्या कलेचा धूर्तपणे व व्यावसायिक दृष्ट्या वापर करतात .तुम्हाला आतल्या आवाजाची देणगी असून ती त्याचा पुरेपूर व्यवसायात वापर करता. तुमच्या सहवास इतरांना सुखावह होतो. सामाजिक रूढी व बंधनांना तुम्ही वाटा देता. स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल विश्वास त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतःच घेण्याकडे कल असतो. संभाषण कलेत प्रवीण असता.जीवनात अधिकार व मान मिळतो .आयुष्य आरामदायक व सुखभोग घेण्याकडे कल असतो. सुगंधी द्रव्य ,आकर्षक कपडे यांचे तुम्ही शौकीन असता. अनपेक्षित पणे पैसा मिळतो ,परंतु बचत करण्याची प्रवृत्ती नसते. केलेल्या कष्टाचे चीज होते .तुमची आर्थिक बाजू समाधानकारक असते. तुम्ही आरोग्याने सुदृढ असता. तुमच्या समाजप्रियतेमुळे घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या बरीच असते. पण तिला योग्य ती साथ तुम्ही देता. घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी तुम्ही रमता. एक निष्ठावान जबाबदारी व पत्नी म्हणून तुम्ही मान्यता पावता. जे लोक आकर्षक ,बुद्धिमान, विचारवंत धडाडीचे, कलेवर प्रेम असलेले आहेत अशा अशांकडे तुम्ही आकर्षले जातात.
शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.
शुभ रंग:- पांढरा आणि हिरवा.
शुभ रत्न:- पाचू आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
आजचे राशिभविष्य
मेष:-मैत्रिणींनो आज कामात नवीन संधी चालून येतील. मन आनंदी राहील. वाहन सुख लाभेल.मात्र आरोग्य जपा.दगदग टाळा.
वृषभ:- मैत्रिणींनो आज विद्यार्थी, खेळाडू व कलाकार यांच्यासाठी चांगला आहे. काहींना बक्षीस, प्रशंसा किंवा मानसन्मान मिळेल. विवाह इच्छुक तरुणीना खूष खबर मिळेल.कामात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होतील. शेअर्स/लॉटरी यात नशीब अजमावून बघा.
मिथुन:- मैत्रिणींनो आज आध्यत्मिक लाभ होतील. दान धर्म कराल. संभाषण कौशल्य दिसून येईल. अचानक लाभ होतील.उत्सवात सहभागी व्हाल.
कर्क:-मैत्रिणींनो आज दिवसाची सुरुवात जोरदार होणार आहे. मनासारखी कामे पार पडतील. अनुकूल चंद्र गुरू योग स्वप्ने साकार करतील. भावंडांची खबरबात कळेल. लेखिकांना खूप चांगला काळ आहे. काहींना जवळपासच्या प्रवासाचे योग येऊ शकतात. प्रवास फ़ायदेशीर ठरतील.
सिंह:- मैत्रिणींनो आज उत्तम सुरुवात आहे. दत्त गुरुची कृपा राहील. नोकरीत चांगले अनुभव येतील. घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. भावंडांच्या भेटीचे/ संपर्काचे योग आहेत.
कन्या:- मैत्रिणींनो आज स्वतःसाठी खर्च कराल.आर्थिक सुयश लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल, महागडे दागिने खरेदी कराल.
तुळ:-मैत्रिणींनो आज मन प्रसन्न राहील.मनासारखी खरेदीचे योग आहेत. परदेशी नोकरीच्या शोधात असाल तर त्यासाठी ही वेळ योग्य आहे. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनुकूल. तीर्थयात्रा घडेल.
वृश्चिक:- मैत्रिणींनो आज अत्यंत सुंदर दिवस. आवडत्या मंडळीशी भेट होईल. नातेवाईकांशी भेट घडेल.पतीची मर्जी राहील.
धनु:-मैत्रिणींनो आज कामात बदल होईल. जबाबदारी वाढेल.घरातील महिलांचे सहकार्य मिळेल. आरोग्य सुधारेल.
मकर:- मैत्रिणींनो आज अत्यंत शुभ दिवस आहे. मुलांकडून छान बातमी मिळेल. परदेशी प्रवास ठरेल.शैक्षणिक यश मिळेल.धार्मिक गोष्टी मध्ये सहभाग घ्याल.
कुंभ:- मैत्रिणींनो आज रुटीन चालू ठेवा. कामे रेंगाळतील.अचानक धनलाभाची शक्यता. ज्योतिष, रियल इस्टेट संबंधित काम करणाऱ्यांना यशदायी काळ.
मीन:- मैत्रिणींनो आज मन प्रसन्न राहील. आवडत्या व्यक्तीसोबत दिवस व्यतित कराल.वाद टाळा.
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.