Rashi Bhavishya | ११ मार्च २०२५ – आजचा दिवस विशेष असून भौम प्रदोष असल्याने भक्तिभावाने महादेवाची आराधना केल्यास शुभ फळ मिळतील. तसेच नक्षत्र आश्लेषा असल्याने काही राशींसाठी संमिश्र परिणाम संभवतात. ज्योतिषानुसार आज आर्थिक स्थैर्य, नातेसंबंध आणि आरोग्य यासंबंधी महत्त्वाचे बदल घडू शकतात.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
आजचा विशेष ग्रहसंयोग
- रवी-चंद्र आणि रवी-हर्षल अशुभ योग – काही राशींना संयमाची गरज
- मीन राशीत बुध-शुक्र युती – आर्थिक आणि वैवाहिक जीवनावर प्रभाव
- चंद्राची कर्क राशीत स्थिती – काहींसाठी लाभ, तर काहींसाठी भावनिक आव्हाने
राशीभविष्य (Rashi Bhavishya Today)
आज भाग्यवान राशी: वृषभ, कन्या, वृश्चिक, मकर
सावधान राहाव्यात अशा राशी: मेष, सिंह, धनु
मेष (Aries) – आर्थिक वाढ होईल, पण खर्चही वाढतील. मोठ्या अडचणीत सापडू नये यासाठी काळजी घ्या.
वृषभ (Taurus) – काही आनंददायक घटना घडतील. भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन (Gemini) – कुटुंबातून सहकार्य मिळेल, पण कार्यस्थळी त्रास संभवतो.
कर्क (Cancer) – व्यवसायिक प्रगती होईल, पण आज मोठ्या अपेक्षा ठेवू नका.
सिंह (Leo) – आज खर्च वाढतील. ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या, मोठे निर्णय टाळा.
कन्या (Virgo) – चांगले अनुभव मिळतील, परंतु पत्नीच्या गैरसमजाने सतर्क राहा.
तुळ (Libra) – काही आनंददायक प्रसंग घडतील, परंतु जबाबदाऱ्या वाढतील.
वृश्चिक (Scorpio) – आर्थिक फायद्याचा दिवस. मौल्यवान वस्तू सांभाळा.
धनु (Sagittarius) – प्रतिकूल दिवस, मोठे निर्णय पुढे ढकला.
मकर (Capricorn) – आत्मविश्वास वाढेल, व्यवसायात चांगली प्रगती संभवते.
कुंभ (Aquarius) – आर्थिक उलाढाल वाढेल, पण सरकारी कामांमध्ये अडचणी येऊ शकतात.
मीन (Pisces) – आज विविध प्रश्न मार्गी लागतील, पण अपेक्षित यश मिळेलच असे नाही.
आजचा राहुकाळ (Rahukaal Today)
- दुपारी ३.०० ते ४.३० दरम्यान महत्त्वाची कामे टाळा.
तुमच्या कुंडलीसाठी वैयक्तिक मार्गदर्शन हवे आहे का?
ज्योतिष सल्ला, करिअर मार्गदर्शन, विवाह योग आणि व्यवसायविषयक माहिती मिळवण्यासाठी ‘ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी (नाशिक) – 8087520521 यांच्याशी संपर्क साधा.
आजचा दिवस चांगला जावो!