उचकी का लागते व उपाय ?

उचकी लागणे-उपाय

उचकी लागली की कोणीतरी आठवण केली असेल असे आपण म्हणतो. मात्र, उचकी येण्याचे शास्त्रीय कारण काहीतरी वेगळे आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

प्रत्यक्ष उचकी लागत असताना श्‍वास बाहेर पडत असतो. या वेळात श्‍वास आत घेता येत नाही, ज्या वेळी उचकी लागण्याचा त्रास आपोआप थांबत नाही, तेव्हा मात्र त्याचे कारण शोधणे आवश्‍यक असते. अन्ननलिकेच्या अस्तरावर आलेल्या सुजेमुळे उचक्‍या लागू लागतात. पोटातील अनेक आजारांत असे घडू शकते. पोटावरील अनेक शस्त्रक्रियांनंतर देखील हाच प्रकार घडू शकतो.उचकी थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय..

1.उचकी थांबत नसल्यास आल्याचा रस व मध हे मिश्रण थोडे थोडे चाटण्याचा उपयोग होताना दिसतो.

2.मद्यपान केल्यानंतर उचकी आल्यास लिंबाचा छोटा तुकडा जीभेखाली ठेवल्यास उचकी लगेच बंद होईल.

3.बर्फ गळ्यावर ठेवल्याने उचकी थांबते.

4.तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी थांबते.

5.गाजराच्या रसाची 4-5 थेंब नाकात टाकल्यास उचकी जाते.असे आदिवासी सांगतात.

6.उचकी लागणार्‍या रुग्णांना डाळींब रस व वेलची पूड मिश्रण चाटवावे व नंतर सूतशेखर मात्रा चाटवावी उचकी थांबते.

7.शेवग्याचा पानांचा काढा करून दिल्यास उचकी व दम्यावर चांगला उपयोग होतो.

8.वाळलेले लिंबू जाळून तयार केलेली राख दोन पळ्या मधात घालून चाटण करावे.

9.नारळाची शेंडी जाळून ती राख मधात कालवून वरचेवर चातावी.

10.जर एखाद्याला सतत उचकी येत असेल तर व्हिनेगर फायदेशीर आहे. उचकी दूर करण्यासाठी एक चमचा व्हिनेगरचे सेवन करा.

11.उचकी किंवा श्वास लागत असेल तर आवळ्याचा रस आणि पिंपळाचे चूर्ण एकत्र करून घेतात.

12.सतत उचकी लागत असेल तर मोराच्या पिसांची राख मधात मिसळून घेतल्याने फायदा होतो.

13.ऊसाचा रस पोटभरून घेतल्याने उचकी थांबते.

14.केळ्यात हिंग घालून किंवा गुळासोबत अथवा बाजरीसोबत हिंग खाल्ल्यास उलटी, ढेकर, उचकी लागणं बंद होतं.

15.पाणी पिताना जर उचकी लागली असेल तेव्हा शक्य असेल तर डोके जमिनीच्या बाजूला वाकवून पाण्याचे घोट घ्या.

16.गणेश रुद्राक्ष नेहमी ऊचकि चा त्रास असणाऱ्या साठी उपयोगी आहे.

17.उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा

18.ताज्या आल्याची फोड तोंडात ठेवल्यास उचकी थांबते.

Leave a Reply