शिर्डी, 6 ऑक्टोबर: अकोले तालुक्यातील गाव-वाड्या आणि वस्त्यांमध्ये दळणवळणाची सुविधा सुधारण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अकोले शहरातील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी पवार बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत अकोले तालुक्यातील गरीब नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
तसेच, त्यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. निळवंडे धरणात भविष्यात जलपर्यटनासाठी नौकाविहार सुविधा निर्माण करण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांना दिलासा देत, कांदा निर्यातबंदी उठविण्याबाबत पवारांनी राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस सिलिंडर व मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचे आश्वासनही दिले.
अकोले येथील महात्मा फुले चौक ते अगस्ती सहकारी साखर कारखाना रस्ता, तसेच तहसील कार्यालयाच्या नूतनीकरणाचे लोकार्पणही करण्यात आले. “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” पुरस्कार प्राप्त उंचखडक जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा तीन लाख रूपयांच्या धनादेशासह सत्कार करण्यात आला.