Allegation Against Neelam Gore for Asking Money for Candidacy : नीलम गोरे यांच्यावर उमेदवारीसाठी पैसे मागितल्याचा आरोप: माजी महापौर विनायक पांडे यांचा गौप्यस्फोट

Allegation Against Neelam Gore for Asking Money for Candidacy: Former Mayor Vinayak Pandey's Revelation

राजकीय वर्तुळात खळबळ: नाशिकमध्ये मोठा आरोप

नाशिक: नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी माजी उपसभापती नीलम गोरे (Neelam Gore) यांच्यावर गंभीर आरोप करत उमेदवारीसाठी पैसे मागितल्याचा गौप्यस्फोट केला आहे. हा आरोप केल्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

पैसे दिल्यानंतरही उमेदवारी मिळाली नाही?

विनायक पांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “मी उमेदवारीसाठी पैसे दिले होते, मात्र तरीही अजय बोरस्ते यांना उमेदवारी देण्यात आली. पैसे परत मागितले असता, नीलम गोरे (Neelam Gore) यांनी परत न दिल्याने मला पत्रकार परिषद घेण्याची धमकी द्यावी लागली. त्यानंतरच मला पैसे परत मिळाले.”

“बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी कधीच पैसे घेतले नाहीत”

पांडे पुढे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी कधीही कार्यकर्त्यांकडून पैसा घेतला नाही. पण नीलम गोरे (Neelam Gore) यांच्यासोबत काम करताना मात्र पैशांचे व्यवहार झाले. त्या कार्यकर्त्यांचेही काम पैसे घेतल्याशिवाय करत नाहीत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

राजकीय स्पर्धेचा फायदा घेतला?

“स्पर्धेचा फायदा घेत नीलम गोरे (Neelam Gore) यांनी पैसे मागितले. त्यांनी डिमांड केली, म्हणून मी दिले. पण इतर कोणीही ठाकरे गटाने मला पैसे मागितले नाहीत. मी महापौर आणि उपमहापौर झालो, तेव्हा कधीच काही द्यावे लागले नाही,” असे पांडे यांनी स्पष्ट केले.

कायदेशीर कारवाईबाबत मोठे विधान

यावेळी कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात पांडे म्हणाले, “जर नीलम गोरे (Neelam Gore) यांना कारवाई करायची असेल, तर त्यांनी करावी. मी त्यांच्यापेक्षा सिनियर आहे आणि राजकारणात हे अनुभवले आहे,” असे ते म्हणाले.

नीलम गोरे यांचा काय प्रत्युत्तर येणार?

या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले असून नीलम गोरे (Neelam Gore) यांचा काय प्रतिसाद येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या या आरोपांवर कोणतेही स्पष्टीकरण देतात का, याकडे राजकीय विश्लेषक आणि जनतेची नजर आहे.