नाशिक: भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत नाशिकच्या सातपुर येथील डेमोक्रॅासी हॉटेलमध्ये भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा दुपारी दीड ते चार दरम्यान होणार असून, यात ७५० भाजप पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या मेळाव्यात केंद्रीय वनमंत्री भुपेंद्र यादव, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, तसेच राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यानंतर, मंगळवारी अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरमध्ये भाजप विदर्भ प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यानंतर छत्रपती संभाजी नगर येथे देखील एक मेळावा झाला. नाशिकमधील मेळाव्यानंतर कोल्हापूर येथे देखील एक कार्यक्रम होणार आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उत्साहाचे वातावरण आहे. अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्याला यशस्वी बनवण्यासाठी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर आणि इतर भाजप पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.