नाशिक – विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील १५ विधासभा
निवडणुकीच्या कल हळूहळू येऊ लागले आहे. बहुतांश ठिकाणी महायुतीने आघाडी घेतली असून महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे. पहिल्या फेरीपासून त्याची सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात भाजपच्या सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, राहुल आहेर, दिलीप बोरसे हे आघाडीवर आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे, सुहास कांदे आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर, छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे, नरहरी झिरवाळ, नितीन पवार हे आघाडीवर आहेत. तर मालेगाव मध्य मध्ये आसिफ शेख आघाडीवर आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक जिल्हयातील १५ विधानसभा मतदार संघात हे उमेदवार आघाडीवर
नाशिक पश्चिम – सीमा हिरे – (भाजप)
नाशिक मध्य – देवयानी फरांदे- (भाजप)
नाशिक पूर्व – राहुल ढिकले – (भाजप)
देवळाली – सरोज अहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
चांदवड – डॉ. राहुल आहेर- (भाजप)
नांदगाव – सुहास कांदे- (शिवसेना शिदि गट)
मालेगाव – दादा भुसे- (शिवसेना शिंदे गट)
येवला – छगन भुजबळ (राष्ट्रवादी अजित पवार गट)
दिंडोरी – नरहरी झिरवाळ- (राष्ट्रवादी अजित पवार गट)
सिन्नर – माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
इगतपुरी – हिरामण खोसकर (राष्ट्रवादी अजित पवार गट)
कळवण – नितीन पवार (राष्ट्रवादी अजित पवार गट)
बागलाण – दिलीप बोरसे – (भाजप)
निफाड – दिलीप बनकर (राष्ट्रवादी अजित पवार गट)
मालेगाव मध्य – आसिफ शेख – (अपक्ष)