अमरावती येथील वरूड परिसरात केल्या काही कालावधीमध्ये पावसामुळे झालेल्या संत्रा

WhatsApp Image 2024 09 02 at 13.36.52 a9a0992c 1

अमरावती : अमरावती येथील वरूड परिसरात केल्या काही कालावधीमध्ये पावसामुळे झालेल्या संत्रा पिकांच्या नुकसान भरपाईचे पंचनामे लवकरात लवकर करावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. वरुड तालुक्यातील नवासा पार्डी येथील ज्ञानेश्वर मोघे यांच्या शेतातील संत्रा पिकांच्या नुकसानीची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली . यावेळी त्यांच्या समवेत खासदार प्रफुल्ल पटेल , आमदार देवेंद्र भुयार जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी राहूल सातपुते आदी उपस्थित होते .

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

वरूड परिसरात गेल्या काही कालावधीपासून सततच्या पावसामुळे संत्रा या पिकाचे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या नुकसानीची तातडीने पंचनामे करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळावी यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशा सूचना फोन द्वारे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांनी केल्या आहेत..

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत्रा पिकाबाबत माहिती घेतली आणि संत्रा पिकांसाठी येणारा खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पादन याबाबत माहिती जाणून संत्र्यांच्या असणाऱ्या जाती, चवीने उत्कृष्ट असणाऱ्या फळांची जाती याबाबत माहिती घेतली तसेच शेतकऱ्यांनी जनावरांसाठी हे हिरवा चारा उत्पादन घेण्यासाठी ही पुढे येण्याचे आवाहन यावेळी त्यांनी  केले..

Leave a Reply