इतिहास आणि उत्पत्ती
Renuka Mata Temple : प्रतिवर्षी आश्विन वद्य प्रतिपदा, अर्थात घटस्थापनेपासून, दामोदर शास्त्री गर्गे हे श्रीक्षेत्र माहूर येथे देवीची पूजा-पाठ करीत असत. ते वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण होते आणि कोजागिरी पौर्णिमेपर्यंत माहूर येथे वास्तव्य करून रेणुका मातेची मनोभावे उपासना करीत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
परंतु, वय वाढल्यामुळे आणि अर्धांगवायूने ग्रस्त झाल्यामुळे त्यांना माहूरला जाणे अशक्य झाले. घरातच राहून त्यांनी देवीची करुणा भाकली आणि विनविले:
“हे माते, आता मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. इतकी वर्षे तुझी सेवा केली, तू ती स्विकारलीस. आता एकच इच्छा आहे—तू माझ्या घरी वास्तव्यास ये.”
आणि काय आश्चर्य! साक्षात रेणुका माता भगवान परशुराम, अंबा, अंबिका आणि अंबालिका या देवींसह प्रकट झाली. सर्व देवांचे तांदळे भूमीतून प्रकट झाले.
ही घटना साधारणतः तीनशे वर्षांपूर्वी घडली.

Renuka Mata Temple : मंदिराचे स्थान आणि महत्त्व
नाशिकमधील तिवंधा चौकात, बुधा हलवाई जवळ, वरमधली होळीच्या दिशेने जाताना एका वाड्यात हे अतीप्राचीन रेणुका माता मंदिर स्थित आहे.
Renuka Mata Temple : मंदिराचा जिर्णोद्धार आणि साक्षीदार
सध्याचे मंदिराचे पुजारी श्री. कमलाकर जोशी सांगतात की, ही हकिकत त्यांच्या मातोश्री इंदिराबाई जोशी यांनी सांगितली होती. त्यांना ही माहिती त्यांच्या मामा मनोहरशास्त्री गर्गे यांच्याकडून मिळाली. नाशिकचे प्रसिद्ध वेदमूर्ती लक्ष्मीकांत दिक्षित यांनी देखील या माहितीला दुजोरा दिला होता.
चार वर्षांपूर्वी श्री. कमलाकर जोशी यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला. आज, नाशिकमधील अतीप्राचीन मंदिरांमध्ये रेणुका मंदिराचा विशेष समावेश केला जातो.

लेखक:
सुनील शिरवाडकर
९४२३९६८३०८
संकलन:
मनाली गर्गे