Artificial Plastic Flower Ban | “उत्पादन थांबवा, विक्री आपोआप बंद होईल” – व्यापाऱ्यांची मागणी

Artificial Plastic Flower Ban | "Stop production, sales will automatically stop" – Traders' demand

Nashik News Update | प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर बंदीचा निर्णय; बाजारपेठेत संमिश्र प्रतिक्रिया

नाशिक Artificial Plastic Flower Ban: राज्य सरकारने कृत्रिम प्लास्टिक फुलांवर बंदी (Artificial Plastic Flower Ban in Maharashtra) जाहीर केली असून, यावर नाशिकमधील व्यापाऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक विक्रेत्यांनी सांगितले की, उत्पादनावरच बंदी आणल्यास बाजारात माल येणार नाही आणि विक्री आपोआप थांबेल.

बाजारात प्लास्टिकपेक्षा पर्यायी साहित्याला मिळतोय चांगला प्रतिसाद

नाशिकच्या बाजारपेठेत फक्त ३०-३५% फुले प्लास्टिकची, तर उर्वरित फुले कापड, कागद, लोकर, फायबर, बांबू अशा पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केलेली असतात. ग्राहकांचा कलही सध्या पर्यायी फुलांकडे वाढत असून, झेंडू, कमळ यांसारखी फुले प्लास्टिकऐवजी सॅटीन, कापड किंवा कागदातून तयार केली जात आहेत.

व्यापाऱ्यांचा आक्षेप – “बंदी विक्रीवर नव्हे, उत्पादनावर घालावी”

व्यापाऱ्यांनी अशी मागणी केली आहे की, सरकारने थेट किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा उत्पादकांवर बंदी घालावी.

“जेव्हा उत्पादन बंद होईल, तेव्हाच विक्री बंद होईल,”
असं मत बहुतेक विक्रेत्यांनी व्यक्त केलं.

त्यांनी यावरही भर दिला की, बंदी लागू करताना सणासुदीच्या कालखंडात निर्णय घेणे चुकीचे आहे आणि सरकारने स्पष्ट, सर्वसमावेशक नियमावली जाहीर करावी.

महिन्याला लाखोंची उलाढाल; सणासुदीला कोटींचा टर्नओव्हर

सध्या नाशिक शहरात महिन्याला ५०-६० लाखांची विक्री, तर सणासुदीच्या कालावधीत ती १ कोटीहून अधिक होते. प्लास्टिक फुलांवर बंदी आल्यास अनेक व्यापाऱ्यांचा व्यवसाय थांबण्याची भीती आहे.

फुलशेती व मधउत्पादनासाठी धोका; पर्यावरणीय दृष्टीने योग्य निर्णय (Artificial Plastic Flower Ban)

फुलशेती, मध उत्पादन, आणि जैविक चक्रावर प्लास्टिक फुलांचा नकारात्मक परिणाम होत असल्याने, पर्यावरणप्रेमी आणि सर्वपक्षीय आमदारांनी ही बंदी लादण्याची मागणी विधानसभेत केली होती.
फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी १७ जुलै रोजी विधानसभेत प्लास्टिक फुलांवर बंदी लागू केल्याचे जाहीर केले.

“स्वस्त तेच चालतं” – पण पर्यावरणाची किंमत लक्षात घ्या!

व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की,

“लोकांच्या खिशाला परवडणारी वस्तू म्हणजेच विक्रीयोग्य वस्तू, म्हणूनच प्लास्टिक फुले खपतात. पण पर्यावरणाच्या दृष्टीने ग्राहकांनीही आता सजग व्हायला हवं.