बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याचा लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस १८ नुकताच संपला असून तो अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. वीकेंड का वॉर एपिसोडमध्ये शार्क टँक इंडियाचे माजी जज आणि भारतपेचे सहसंस्थापक अशनीर ग्रोवर हे देखील सहभागी झाले होते. त्यावेळी सलमानने त्यांच्या एका जुन्या मुलाखतीतील वक्तव्यावर प्रश्न विचारले होते.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या वादानंतर आता अशनीर ग्रोवर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जिथे ते सलमान खानवर(Salman Khan) खुलासा करताना दिसत आहेत.
एनआयटी कुरुक्षेत्रच्या एका कार्यक्रमात बोलताना अशनीर ग्रोवर म्हणाले,
“फालतू पंगा घेऊन त्याने (सलमान) उगाचच स्पर्धक उभा केला. मी शांततेत गेलो होतो, पण त्याने वाद निर्माण केला. जर त्याला माझं नाव माहितीच नसलं, तर मला शोमध्ये बोलवलं कशाला?
ते पुढे म्हणाले, मी सलमानला आधीच भेटलो आहे. कारण तो माझ्या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर होता. तो मला ओळखत नसेल, असं कसं होऊ शकतं?”
पूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अशनीर ग्रोवर यांनी सांगितले होते की, एका जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान त्यांनी सलमान खानला भेटले होते. मात्र, सलमानच्या मॅनेजरने त्यांना सांगितले की, सलमान फोटोसाठी पोझ देणार नाही. बिग बॉस १८ च्या मंचावर सलमानने यावर खुलासा करत, अशनीर ग्रोवर यांना जाहीरपणे प्रश्न विचारले होते.
अशनीर ग्रोवरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. अनेकांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या असून काही जण सलमानच्या बाजूने आहेत, तर काही जण अशनीर ग्रोवरच्या समर्थनात आहेत.