बुधवार, २६ फेब्रुवारी २०२५. माघ कृष्ण त्रयोदशी/चतुर्दशी. शके १९४६, संवत २०८१, वसंत ऋतू, उत्तरायण.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज वर्ज्य दिवस आहे” महाशिवरात्री
नक्षत्र: श्रवण (चंद्र)/(संध्याकाळी५.२३ नंतर) धनिष्ठा (मंगल). आज जन्मलेल्या बाळाची राशी- मकर. (विष्टी करण शांती)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा गुरुशी त्रिकोण योग आहे तर हर्षल शी केंद्र योग आहे. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक चिंता मिटतील. सामाजिक कार्यातून मात्र एखाद्याचा गैरसमज होऊ शकतो. (Aries Horoscope Today)
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. कुटुंबासाठी खरेदी होईल. प्रिय व्यक्ती साठी वेळ द्याल. सौख्य लाभेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. खर्च वाढेल. (Taurus Horoscope Today)
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. अर्थकारण सुधारेल. अचूक लाभ होतील. श्री दत्तगुरूंची उपासना करा. (Gemini Horoscope Today)
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवस अनुकूल आहे. मनासारखी कामे पार पडतील. प्रवास घडतील. शत्रूचा पराभव निश्चित आहे. नोकरीच्या ठिकाणी वादविवाद टाळा. (Cancer Horoscope Today)
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) व्यावसायिक लाभ वाढतील. नोकरीतील कामात यश मिळेल. नवीन संधी चालून येतील. प्रवासात अडथळे येऊ शकतात. (Leo Horoscope Today)
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. पंचम स्थानी चंद्र आहे. कामाचा पसारा वाढेल. आर्थिक लाभ होतील. एखादी अप्रिय बातमी येऊ शकते. (Virgo Horoscope Today)
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक दृष्टीने संमिश्र दिवस आहे. चतुर्थ स्थानी चंद्र आहे. सौख्य लाभेल. कठोर मेहनत करावी लागेल. शत्रूत्रास जाणवेल. (Libra Horoscope Today)
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सामजिक कार्यात यश मिळेल. प्रिय व्यक्तीची साथ लाभेल. स्पर्धेत विजयी व्हाल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. (Scorpio Horoscope Today)
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) व्यवसायात अनुकूलता वाढेल. आर्थिक लाभ होतील. सौख्य लाभेल. संतती कडून काहीशी निराशा अनुभवण्यास येईल. (Sagittarius Horoscope Today)
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्याच राशीत चंद्र आहे. अनुकूल आणि उत्साही दिवस आहे. स्वप्ने पूर्ण होतील. संतती बाबत चांगली बातमी समजेल. घरगुती किंवा वसाहतीत कटकटीं होऊ शकतात. (Capricorn Horoscope Today)
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. तरीही काही सुखद अनुभव येतील. खर्च वाढतील. घरी आराम करणे चांगले. (Aquarius Horoscope Today)
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. व्यवसायातून लाभ होतील. मनासारखी कामे होतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. (Pisces Horoscope Today)
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)