Astrology : माघ अमावस्या २०२५: राशीभविष्य आणि शुभ-अशुभ योग | ज्योतिष मार्गदर्शन

Today Rashibhavishya

Astrology आजचा दिवस आणि ग्रहस्थिती:
गुरुवार, २७ फेब्रुवारी २०२५. माघ अमावस्या, वसंत ऋतू, शके १९४६, संवत २०८१. क्रोधीनाम संवत्सर. आजचा दिवस दर्श अमावस्या असल्याने काही शुभ कार्य टाळावीत. चंद्राचे नक्षत्र धनिष्ठा असून दुपारी ३.४४ नंतर शततारका नक्षत्र सुरू होईल.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राहुकाळ: दुपारी १.३० ते ३.००

राशीभविष्य (Astrological Predictions):

मेष (Aries):

रवी-चंद्र युती आणि बुध-हर्षलचा लाभ योग आहे. बौद्धिक क्षेत्रात चमक दिसेल. परंतु अनैतिक मार्ग अवलंबल्यास मोठा फटका बसेल.

वृषभ (Taurus):

दशमस्थानी चंद्र आहे, त्यामुळे पराक्रम गाजवाल. व्यवसायात नवीन संधी मिळतील. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या देखभालीची गरज भासेल.

मिथुन (Gemini):

नवमस्थानी चंद्र आहे. काही सुखद अनुभव येतील. शेती, गुंतवणूक आणि पारंपरिक व्यवसायात लाभ होईल. विलंब संभवतो.

कर्क (Cancer):

संमिश्र दिवस. आरोग्य सांभाळा. नोकरीत सुधारणा दिसेल, परंतु अनावश्यक खर्च वाढू शकतो.

सिंह (Leo):

अनुकूल दिवस. नोकरीत उत्तम प्रगती होईल. वरिष्ठांचे प्रोत्साहन मिळेल. अहंकार टाळावा.

कन्या (Virgo):

लक्ष्मी कृपा राहील. व्यवसायात प्रगती होईल. परंतु जंगलातील प्रवास टाळा.

तुळ (Libra):

आर्थिक लाभाचे संकेत आहेत. धाडसाने निर्णय घ्याल. बोलताना आणि कागदपत्रांवर सह्या करताना काळजी घ्या.

वृश्चिक (Scorpio):

सामाजिक वर्चस्व वाढेल. प्रिय व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. बौद्धिक क्षेत्रात गोंधळ होऊ शकतो.

धनु (Sagittarius):

आर्थिक लाभ होतील. वक्तृत्व चमकेल. मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या.

मकर (Capricorn):

अध्यात्मिक क्षेत्रात यश मिळेल. राजकारणात संधी मिळू शकते. गुंतवणुकीतून लाभ होतील.

कुंभ (Aquarius):

आज तुमच्या राशीत अमावस्या आहे, त्यामुळे प्रवास टाळावा. सामाजिक क्षेत्रात नाव कमवाल. बौद्धिक क्षेत्रात मोठे यश मिळेल.

मीन (Pisces):

संमिश्र दिवस. कामाची प्रगती होईल. शत्रू पराभूत होतील. प्रवासाचे नियोजन चुकीचे होऊ शकते.

विशेष मार्गदर्शन:

  • तुमच्या कुंडलीनुसार करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर समस्यांवर सल्ला घ्या.

संपर्क: ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521