नाशिकः शिवसेना उपनेते आणि माजी समाजकल्याण, महिला आणि बालकल्याण मंत्री बबन घोलप यांनी आज शिवसेना (शिंदे गट) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून दिलेल्या राजीनाम्यात त्यांनी ६ एप्रिल रोजी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर समाजाच्या काही महत्त्वाच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु एकही मागणी मान्य न झाल्याने समाजात नाराजी पसरली आहे.घोलप यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या पुत्र माजी आमदार योगेश घोलप यांना देवळा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे आभार मानत असताना, शिंदे गटाच्या दुर्लक्षामुळे अखेर राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.बबन घोलप उद्या औपचारिकपणे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.