साल्हेर किल्ल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवण्यासाठी मार्ग खुला

salher kilyachi pahaani

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक, 12 सप्टेंबर 2024 – नाशिक जिल्ह्यातील बागलाणमध्ये स्थित साल्हेर किल्ल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवण्याची संधी प्राप्त झाली आहे. शिवकालीन किल्ला असलेल्या साल्हेरच्या ऐतिहासिक महत्त्वाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींनी पावन असलेल्या या किल्ल्याला युनेस्कोच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केल्यानंतर काही दिवस साल्हेर किल्ल्यावर थांबले होते, आणि त्याच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे हा किल्ला जतन करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील साल्हेर किल्ला आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ल्याचे यादीकरण करण्यात आले आहे.

या प्रस्तावाच्या एका भाग म्हणून, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी त्यांच्या अधिका-यांसह साल्हेर किल्ल्याला भेट देऊन त्याचे ताळमेळ पाहिले. येत्या महिन्यात युनेस्कोच्या तज्ञांची टीम येथे येऊन किल्ल्याची पाहणी करणार आहे, ज्यामुळे या ऐतिहासिक किल्ल्याला जागतिक मान्यता मिळवण्यासाठी एक मोठा टप्पा पूर्ण होईल.

साल्हेर किल्ल्याची युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणे म्हणजे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची मोठी ओळख होईल. यामुळे किल्ल्याच्या संवर्धनासाठी अतिरिक्त मदतीची आणि जागरूकतेची वावगेच आहे.

Leave a Reply