बालमटाकळी ग्रामपंचायत ग्रामसभा खेळीमेळीत संपन्न,

बालमटाकळी ग्रामपंचायत ग्रामसभा खेळीमेळीत संपन्न,

ग्रामसभेत विविध विकास कामावर विचारविनिमय,

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बालमटाकळी येथे आज रोजी ग्रामपंचायतची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली. सरपंच राम बामदळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भगवान विद्यालय, ग्रामपंचायत समोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गावातील अत्यावश्यक ठिकाणी लाईट पोल बसवणे आणि शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयांवर विचारविनिमय झाला. सभेच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे गावाच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे ठरवले आणि आगामी योजनांवर एकत्रितपणे काम करण्याचे वचन दिले. ग्रामसभेचे हे यश ग्रामस्थांच्या एकोप्याचे आणि प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या या गावाचे प्रतिक ठरले. या कार्यक्रमांमध्ये रामनाथ राजपुरे, सरपंच राम. बांमधळे, कासम शेख, सर्जेराव घोरपडे,संदीप देशमुख, विठ्ठल देशमुख, विक्रम बारवकर, अशोक खिळे, ग्रामसेवक, तलाठी , कृषी सहाय्यक , ग्रामपंचायत कर्मचारी सतीश खेळकर, इतर खात्यातील कर्मचारी ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply