Bid: बीड प्रकरणातील फरारी आरोपींच्या संपत्ती आणि मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या या सूचनांमध्ये, बंदुकी आणि पिस्तुले दाखवीत छायाचित्रे काढणाऱ्या बीडमधील नेते आणि धनाढ्य व्यक्तींचे शस्त्र परवाने तातडीने रद्द करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
फडणवीस यांनी या मुद्द्यावर कठोर भूमिका घेत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाला फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांच्या बेकायदेशीर मालमत्तेवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच, शस्त्र परवान्यांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.