छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित बिडकीन औद्योगिक प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मोदी यांनी नमूद केले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, तसेच उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते.ऑरिक बिडकीन औद्योगिक प्रकल्प दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत विकसित होत आहे आणि या प्रकल्पाचे उद्दिष्ट तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे.
प्रकल्पात पायाभूत सुविधांचा विकास होऊन ८,००० एकर क्षेत्रावर औद्योगिक वसाहतीचा विस्तार झाला आहे. बिडकीन प्रकल्पामुळे ६० हजार कोटींची गुंतवणूक होणार असून ३५ हजार प्रत्यक्ष आणि ७५ हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे.ऑरिक औद्योगिक क्षेत्रात अनेक नामांकित कंपन्या गुंतवणूक करत आहेत, ज्यात अथर एनर्जी, पिरामल फार्मा, कॉस्मो फिल्म्स, आणि लुब्रीझॉल यांचा समावेश आहे. तसेच टोयाटो किर्लोस्कर मोटर आणि JSW ग्रीन मोबिलिटी सारख्या कंपन्याही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.