बुलढाणा: बुलढाणा येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात रात्री सुमारे आठ वाजता अचानक एका अस्वलाने प्रवेश केला, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. वन विभागाच्या रेस्क्यू टीमने तत्काळ कारवाई करत 8 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मध्यरात्री 3 वाजता अस्वलाचे यशस्वी रेस्क्यू केले. अस्वलाला बाहेर काढणे कठीण असल्याने त्याला इंजेक्शनद्वारे सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेस्क्यू नंतर अस्वलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आज सायंकाळी पाच वाजता त्याला अंबाबरवा अभयारण्यात नैसर्गिक वातावरणात सोडले जाणार आहे. या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये बुलढाणा शहर पोलिस, बुलढाणा नगरपालिकेचे कर्मचारी आणि वन विभागाच्या टीमने महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या घटनाक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच चर्चेचा विषय झाला असून, वन विभागाने वेळीच केलेल्या कारवाईमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही,